Wednesday, 2 September 2015

असे पाहुणे येती ...


***

मागील काही वर्षापासून हे पाहुणे ( "गोगलगाय आणि पोटात पाय" वाली गोगलगाय ) आमच्याकडे रात्री हटकून येतात, 
आधी पाय पडणार म्हणून थोडा त्रागा व्हायचा खरा पन आता नाही तसे वाटत , रस्त्यात दिसले की आपोआपच वाकून बाजूला उचलून ठेवतांना आता त्रागा नाही होत , एवढेच काय बरेचदा येणार जाणा-यांना खाली गोगलगाय असल्याने जपून चालण्याची तंबी आईकडून नेहमीच मिळते ..... 
जणू घरचेच सदस्य झालेत हे !

***



***

दिवसभर कुठे जाऊन दडतात कुणास ठाऊक पण रात्र व्हायला आली की कुठून कुठून सारे पायरी बाजूला जमा होतात तिथे काऊसाठी, कुत्र्यासाठी ठेवलेल्या अन्नातील उरलेले अन्न गट्ट करण्यासाठी यांची लगबग असते.
.
.
कधी कधी अक्षरशः "दहीहांडी " सारखे एकावर एक दाटीने उभे होऊन खालिल अन्न खातात .


***


***
आधी उरलेलेच अन्न यांना मिळायचे पण आता आई कापलेले भाजीपाल्यांचे तुकडे, खरकटे, इतर अन्न यांना टाकते, तरीही यांच्या वाढत्या लोकसंख्येत ते अन्न थोड्यात वेळात खतम होते . 
.
.
.
हा फोटो काढला तेव्हा ८-९ स्क्वे.फुट मध्ये यांची संख्या १३० च्या जवळपास असणार, याशिवाय आवारातच इकडेतिकडे यांची गटा - गटाने जमलेली संख्या वेगळीच !

***


***


***


***


आई ... मला पाठगुली घे ना ! - असे बहुदा म्हणत असावा हा गोगल बच्चा !

***

ही खरी लैला , खरी सावित्री, हो नं ?




          आजच्या जगात स्वतःला सावित्री, लैला समजणारे किंबहुना म्हणवून घेणा-या खूप मुली, स्त्रिया दिसतील अगदी मोसमी किड्या प्रमाणे, त्रास झाला की लगेच फारकत घेणारे. मात्र या जगात वावरतांना बारामतीतील ही गोष्ट मनाला विचार करण्यास भाग पाडते, खरच किती भाग्यवान तो पुरुष ज्याला अशी जीवन सोबत मिळाली .

           स्वतःच्या कष्टाने तिन्ही मुलींचे लग्न लावून झाल्यावर कुंकुवाच्या धन्याची तब्येत खराब झाली, घरात पैसे नाही, मोलमजुरी करून किती करणार शेवटी पैश्यासाठी भिरभिरना-या  डोळ्याला बारामती येथे तीन किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा असून जिंकणा-याला बक्षीस भेटेल हे दिसले आणि काय नवल ६६ वर्ष वयाच्या बुलडाण्याच्या या  आजीबाई मागीलवर्षी आपल्या धन्यासाठी ( धन्याचे नाव: भगवान करे ) या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कोणाची पर्वा न करता ही बाई बिना चपलाने , चक्क लुगड्या वर ही शर्यत धावून पार केली आणि जिंकली सुद्धा !

          लता करे या ६६ वर्षीय बाईला यांनी नव-याला बरं करायच्या ध्यासात  मॅरेथॉनमध्ये भाग गेतला आजूबाजूच्या उच्चभ्रू लोकांकडे दुर्लक्ष करून या बाईने चप्पलाशिवाय, घरच्या लुगड्यावर मॅरेथॉनमध्ये धावली व जिंकली ही !  बायकोच्या या  तपस्ये पुढे पती भगवान करे पुरते भारावून गेले होते.

                खरच थोर ती बाई वं धन्य तिचा नवरा भगवान करे , नाही का ?


***

भाऊबीज अशीही ... !


मागील  वर्षीचा एक  भाऊबीजेचा एक किस्सा आठवला  तो मुद्दाम इथे नमूद करावा वाटला ...
.
.
.
.

इतक्यातच १ परिचिय झालेला मुलगा ... १५-१८ वर्षे वय , पतला- सडपातळ पण पाणीदार चेहऱ्याचा , घरच्यांशी भांडून अलग राहतो, मोलमजुरी करून जगतो .


रात्री उशिरा रूमकडे जाताना दिसला . मी टोकले - कुठून रे ?, उत्तर - घराकडून आलो ! , मी - का बरे ? तू जात नसतो ना ? ( माझ्या माहिती नुसार तो घराकडे कधीच जात नाही ) 

तो - अजी , मालका कडे गेलो थोडे पैसे मागितले , आज भाऊबीज आहे न ; मग मित्राकडे गेलो, मित्राकडून बहिनेले त्याच्या घरी बोलावलं ..... आज भाऊबीज नाही का ? तिले भेटलो पैसे बी दिले अन आता आलो .मला काही वेगळे वाटले थोडे त्याला बोलते केले , काही माहिती मिळाली तर आवकच झालो ...
.
काही महिन्या आधी त्याच्या बहिणीवर वाईट कृत्य झाले होते ..... आज हा अलग राहतो पण याचे लक्ष तिच्याकडे असते .... तिची काळजी वाटते ... घरचे मोल मजुरी साठी बाहेर जातात परत तसे काही होऊ नये म्हणून हा अधात - मधात, रात्री - बेरात्री तिकडे चकरा मारत राहतो ...बाहेरून पाहत राहतो ... मित्राकडून कानोसा घेत राहतो .
.
.
माई बहिण आहे म्हणून तर तिकडे जा लागते , नई त कशाले जातो. - तो बोलला नी समोर निघाला पण ! 
मला काय बोलावे कळलेच नाही, काही क्षणासाठी समोरचे जग तरंगताना जाणवले ..... काही असो तो , त्याचे "माई बहिण "म्हणणे व दिसणारी आपुलकी भरीव वाटली ..... एकदम sollllllllllid !





***

Good Morning !




आमच्या नागपूर च्या घरातील समोरच्या गॅलरी मध्ये हटकून व जबरदस्तीने येऊन बाळंतपण करणारी "बुलबुल "चे हे एक पिल्लू... !  

माझे बारसेच नाही केले अजून म्हणून रुसून बसलाय जणू  एका सकाळी ..... !

***
त्याच्या एका  भावंडाचा फोटो दाखवू तुम्हाला

एक मिनिट हं
.
.
हे बघा कसे खाय ... खाय करताय ते ....
.




आहे की नाही गम्मत .!

हसवा .. . . हसवी .

थोडे हसू या ...हं . !

.
.
.

कावळा
सरळ
का
उडतो?

कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच...
'का-वळा'?


       --- *** ---
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी 

               --- *** ---
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..

कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 
--

भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर


      --- *** ---
रशियन डोअरकिपरचे नाव काय? 
.

.
उभा का बस की
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ? 
.
.
.

कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 
        --- *** ---
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल? 
.
.
.
.
वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ? 
.
.
.

ओला होईल
      --- *** ---

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली 
-----

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली 
           --- *** ---

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ? 
.
.
कारण वाटेत नळ स्टॉप आहे. 
                --- *** ---

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे
🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
.
..
.
हसायच नाही
..
.
.
.
.
.
.
आमटी


                --- *** ---
एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
घालण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू... कुत्र्याचं शेपूट
कधीच
सरळ होत नसतं.
..
..
..
.
मकरंद : गप रे रताळ्या.... मी पाईप
वाकवतोय..